पाहणी करीत पोलिसांना दिल्या सूचना
शिक्रापूर – कोरगाव भीमा (ता. शिरूर) येथे दि. 1 जानेवारी 2020 रोजी होणाऱ्या विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची पाहणी महाराष्ट्र राज्य मुंबई कायदा व सुव्यवस्था विभागाचे अपर पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी गुरुवारी (दि. 26) केली असून येथील बंदोबस्त व नियोजन बाबतची माहिती त्यांनी घेतली आहे.
कोरेगाव भीमा येथे एक जानेवारी 2018 रोजी झालेली दंगल व त्याचे राज्यात उमटलेले पडसाद त्यांनतर सध्या प्रशासन सतर्क झाले आहेत. सध्या 1 जानेवारी 2020च्या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू असून आज रजनीश शेठ यांनी पेरणे फाटा विजय रणस्तंभ, वढू बुद्रुक समाधीस्थळ, सणसवाडी येथे भेट देऊन नियोजनाची पाहणी केली.
यावेळी इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी रजनीश शेठ यांनी लोणीकंद तसेच शिक्रापूर पोलीस ठाणे हद्दीतील पार्किंग, सीसीटीव्ही यांसह इतर सुविधांची माहिती घेत कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली असून प्रशासनास योग्य सूचना केल्या आहेत.