12 जणांचा मृत्यू : 944 जणांना डिस्चार्ज
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात करोनाबाधित रुग्णांमध्ये आज 721 नवीन रुग्णांची भर पडली. तर आतापर्यंत 21 हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. आज 944 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत शहरात 29,836 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर 613 जणांचा मृत्यू झाला आहे.
महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, आज चार वाजेपर्यंत शहरात 721 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. शहरातील 679 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील 42 जणांना करोनाची लागण झाली. आज दिवसभरात 12 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहरातील एकूण रुग्णांची संख्या 29,836 इतकी झाली आहे. शहरातील महापालिकेचे रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सद्यःस्थितीत शहरात 5574 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 428 रुग्णांचाही समावेश आहे.
महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, सोमवारी दिवसभरात 12 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 11 तर शहराबाहेरील एका रुग्णाचा बळी गेला. शहरातील पिंपरी, इंद्रायणीनगर, दिघीरोड भोसरी, पिंपळे गुरव, संभाजीनगर, चिंचवडगाव, रुपीनगर येथील 11 रुग्णांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील देहूरोड येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला.
आज दिवसभरात 944 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 21,208 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 2030 संशयित रुग्णांना महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांतील 2704 जणांचे तपासणी अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.