पुणे (प्रतिनिधी) : सहकारनगर भागात एका सोसायटीच्या परिसरात असलेले चंदनाची झाड कापून नेणारा चोरटा एका नागरिकाने दाखविलेल्या सतर्कतेमुळे पकडला गेला.
पोलिसांनी तत्परतेने घटनास्थळी धाव चोरट्याला पकडले. त्याच्याबरोबर असलेले दोन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
याप्रकरणी अविनाश संजय ठोंबरे (वय २१, रा.लोणी भापकर, ता.बारामती, जि.पुणे) याला अटक करण्यात आली आहे. अतुल लिमये (वय ५८, रा.सहकारनगर क्रमांक २) यांनी यासंदर्भात दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे