सासवड -सासवड शहरात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सासवड शहर करोना हॉटस्पॉट बनला आहे. सासवड शहरातील एकूण करोना पॉझिटिव्ह संख्येत शनिवार (दि.27) तब्बल 6 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील एकूण पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 26 वर पोहचली आहे.
आज आढळलेल्या नवीन 6 रूग्णांमध्ये शहरातील कोडीत नाका परिसरातील दोन दिवसांपूर्वी करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या बॅंक कर्मचाऱ्यांच्या 60 वर्षीय आईचा समावेश आहे.
यासोबतच शहरातील लांडगे आळीमध्ये 2 रूग्ण, हडको परिसरातील सुर्वणनगरी हौसिंग सोसायटीतील 1 रूग्ण, नेताजी चौकातील 1 रूग्ण आणि चव्हाण कॉर्नर ते लांडगे आळी परिसरातील एका 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. बाधित वाढत असल्यामुळे शहरात घबराट पसरली आहे.