पुणे – शहरात मागील काही दिवसांपासून करोनाच्या चाचण्यांची संख्या सुमारे एक हजारने कमी करण्यात आली होती. आता, बुधवारपासून त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.
त्यानुसार 6 हजार 256 व्यक्तींची करोना चाचणी घेण्यात आली. यामध्ये 1 हजार 336 करोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, 1 हजार 431 करोनाचे रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
शहरात गेल्या पाच दिवसापासून बाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्या वाढली आहे. मात्र मृत्यूचे सत्र कायम असल्याने मृत्यू रोखणे मोठे आव्हान ठरत आहे.
करोनामुळे दिवसभरात 66 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यातील 26 रुग्ण हे पुण्याबाहेरील आहेत. करोना बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 1 लाख 45 हजार 291वर पोहोचली आहे.