बारामती तालुक्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठी असणारी ग्रामपंचायत म्हणजे काळखैरेवाडी. शेतकरी कुटुंबातील विशाल भोंडवे यांनी सामाजिक भान जपत आपला व्यवसाय सुरू केला; परंतु या सामाजिक बांधिलकीतून त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. ते सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून गावगाड्याची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकाळात विकासकामांचा डोंगर उभा केला. लोकसहभाग आणि विकासात्मक दूरदृष्टी या बळावर त्यांची वाटचाल ही व्यावसायिक, सरपंच ते बाजार समितीच्या संचालकपदापर्यंत झाली आहे. माजी सरपंच विशाल भोंडवे यांच्या कार्यकाळातील टिपलेला कार्यपैलू…
विशाल भोंडवे यांचे वडील ज्ञानदेव भोंडवे हे एसटी महामंडळात ते वाहक म्हणून काम करीत होते. शेतकरी कुटुंबाची त्यांची पार्श्वभूमी आहे. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी व्यवसायास सुरुवात केली. सामाजिक कार्याची त्यांना आवड होती. त्यामुळे ते सामाजिक क्षेत्रातून त्यांनी लोकांची मने जिंकत गेले. सामाजिक क्षेत्रात त्यांनी लोकांना आर्थिक मदतीचा हात दिला. सामाजिक कार्य करीत असताना काळखैरेवाडी गावाला सर्वसाधारण गटातून सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले. त्यानंतर लोकांच्या आग्रहास्तव त्यांनी थेट सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले. सामाजिक कार्याच्या जोरावर त्यांना जनतेच्या पसंतीस उतरले. विशाल ज्ञानदेव भोंडवे हे गावगाड्यातील राजबागमधील एक उमदे नेतृत्व. बीएस्सीपर्यंतचे शिक्षण घेऊन त्यांनी राजकारणात उडी घेतली. गावविकासाचा ध्यास करायचा, याचा निश्चय केला.
या गावची सरपंचपदाची धुरा विशाल भोंडवे यांच्या हाती आली आणि विकासपर्वाला सुरुवात झाली. त्यामुळे गावविकासात झोकून देऊन काम केले. विकासकामांत लोकसहभाग गरजेचा आहे, ही दूरदृष्टी विशाल भोंडवे यांनी उराशी बाळगून गावविकासासाठी श्रीगणेशा सुरू केला. उद्योजक क्षेत्रात नवलौकिक मिळवत असतानाच त्यांनी ग्रामस्थांच्या आग्रहास्तव जनमतातून सरपंच पदासाठी उभा राहिले. समाजमान्यता असलेले विशाल भोंडवे हे गावचे लोकनियुक्त प्रथम सरपंच झाले. त्यांच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडल्यानंतर त्यांनी विकासाचा ध्यास घेतला.
एसटी महामंडळाला बससेवा सुरू होण्याबाबत निवेदन दिले होते; परंतु बससेवा अद्याप सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन त्यांनी पाठपुरावा सुरू केला. विशाल भोंडवे यांनी काळखैरेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी काळखैरेवाडी ते सुपा असा मोफत प्रवास सुरू करून दिलासा दिला आहे. त्यामुळे विद्यार्थी वेळेवर शाळेत पोहोचत आहेत. मिळालेल्या वेळेत विद्यार्थ्यांचा अभ्यासही होत आहे. त्यांनी विद्यार्थ्यांची सोय करून पालकांना निश्चिंत केले आहे.
स्मशानभूमी सुधारणा, ग्रामपंचायत कार्यालय व परिसर सुधारणा, गावामध्ये 12 हायमास्ट बसवले आहेत. अंधार दूर केला आहे. विविध आरोग्य शिबिर राबवून ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेऊन पुढील उपचारासाठी त्यांना मदतीचा हात दिला. अशा विविध विकासकामांनी सरपंच विशाल भोंडवे यांनी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्याचे काम केले आहे. सरपंच विशाल भोंडवे यांनी गावात तसेच तालुक्यात विकासकामांचा डोंगर उभा करीत बारामतीच्या राजकीय पटलावर उदयोन्मुख नेतृत्व म्हणून उदयाला आले आहे. त्याची पोचपावती ही त्यांना तालुका पातळीवर काम करण्याची संधी देऊन गेली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामांचा धडाका लावला. अजितदादा यांचा आदर्श मानून दूरदृष्टी आणि नियोजन, अंमलबजावणी या जोरावर कामे तडीस नेली. गावविकासात काम करीत असताना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. त्यांच्या बळावर त्यांनी विकासकामे खेचून आणली आहेत. गावातील विकासकामे तडीस नेताना गावात मूलभूत सुविधा उपलब्ध केल्या आहेत. अनेक कामे प्रस्तावित आहेत. तसेच परिपूर्ण विकासासाठी त्यांनी एक व्हिजन ठेवले आहे. ते सर्व सदस्य, स्थानिक नेते यांचे मार्गदर्शन आणि पाठबळ मिळत आहे. त्यामुळे एक ऊर्जा मिळत आहे. हे गावासाठी आशावादी आणि सकारात्मक आहे.
सरपंच घरकुल योजना
ग्रामपंचायतीच्या स्व-निधीतून गरजू लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करून देणारी काळखैरेवाडी ग्रामपंचायत महाराष्ट्रातील एकमेव ग्रामपंचायत असेल. सरपंच घरकुल योजना हा उपक्रम विशाल भोंडवे यांनी हाती घेऊन 5 गरजू लाभार्थ्यांना प्रत्येकी 1 लाख रुपयांचा निधी देऊन लाभार्थ्यांना घरकुल दिले आहे.
पाणी प्रश्नावर कायमचा तोडगा
काळखैरेवाडी परिसरामध्ये पाणीप्रश्न गंभीर होता. गावामध्ये पिण्याच्या पाण्याचे टॅंकर सुरू होते. नेहमीच गावकऱ्यांना प्रशासनावर अवलंबून राहावे लागत होते. गावची ही समस्या कायमस्वरूपी मिटविण्याचे त्यांच्यासमोर आव्हान होते. पाण्याची टंचाई तीव्र होती. अशातच सरपंच विशाल भोंडवे यांनी सुपे येथे तलावाशेजारी जागा विकत घेऊन तेथे विहीर खोदून सुपा ते काळखैरवाडीपर्यंत पाणीपुरवठा पाइपलाइन करून संपूर्ण गावाचा पाणीप्रश्न सोडवला. टॅंकर बंद झाले. या कामगिरीचे ग्रामस्थांनी भरभरून कौतुक केले. या केलेल्या कामामुळे ग्रामस्थांची तहान भागली. गावकऱ्यांची तृष्णा भागविणारे ते खऱ्या अर्थाने जलदूतच ठरले आहेत.
सरपंच ते संचालक
विशाल भोंडवे यांनी सरपंच पदावर आल्यानंतर कामाचा धडाका लावला. याचदरम्यान, कामाची पोचपावती म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांच्यावर विश्वास दाखवत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सरपंच गटातून उमेदवारी दिली. राष्ट्रवादीने दिलेल्या संधीचे विशाल भोंडवे यांनी सोने केले आहे. विक्रमी मतांच्या जोरावर त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजय संपादन करून कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालकपदी त्यांची निवड झाली.
गावविकास
काळखैरेवाडीअंतर्गत पठारे वस्ती, गायकवाड वस्ती येथे आरसीसी पाण्याची टाकी बांधून तेथे पाइपलाइन करून पाणीपुरवठा केला. गावच्या सुरक्षेसाठी गावामध्ये सीसीटीव्ही बसवले. बांदलवस्ती येथील हुमजाई माता परिसरात सुशोभिकरण केले. खैरेपडळ, पठारे वस्ती, भोंडवे चांदवडे वस्ती येथे ओढ्यावरील फुलांचे बांधकाम करून दळणवळणास चालना मिळाली आहे. कुतवळवस्ती येथील संपूर्ण रस्ता डांबरीकरण, कुतवळवस्ती-पठारेवस्ती रस्ता, सुपे मोरगाव ते राजबाग – शेरेवाडी रस्ता, राजबाग अंतर्गत सिमेंट कॉंक्रेट रस्ता, काळखैरेवाडी गावठाण अंतर्गत विविध रस्ते, काळखैरेवाडी येथे स्मशानभूमी सुधारणा, खैरेपडळ येथील ओढा खोलीकरण, राजबाग विठ्ठल मंदिर येथील सभामंडप व सुशोभिकरण, गोलपत्रा, बांदलवस्ती येथे पाइपलाइन, पठारेवस्ती दत्त मंदिर सर्व मंडप मंजूर केला, शेंडगेवस्ती येथील सिद्धेश्वर मंदिर सभामंडप आदी पूर्ण झाली आहेत.
योजनेतून ग्रामस्थांना आधार
जिल्हा परिषद, पंचायत समिती यांच्या मार्फत ज्या पद्धतीने योजना राबविण्यात येतात, त्याच पद्धतीने ग्रामपंचायतीने उपलब्ध केलेल्या निधीतून ग्रामस्थांसाठी विविध वस्तूंसाठी अनुदान उपलब्ध करून त्यांना आधार देण्याचे काम केले. या योजनामध्ये कडबा कुट्टी 25, मिल्किंग मशीन 15, शेततळे अनुदान 15, पीठ गिरणी 14 अशा वस्तूंच्या माध्यमातून अनेक गरीब कुटुंबांना आधाराचा हात दिला आहे. शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील लोकांच्या दारी पोहोचल्या पाहिजेत, हा त्यांचा ध्यास कायम आहे.
संकलन : सोमनाथ कदम, सुपे.