मुंबई – टीव्ही अभिनेत्री वैष्णवी धनराजचा ( vaishnavi dhanraj ) एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री मदतीची याचना करताना दिसत आहे. वैष्णवी धनराज हिच्या चेहऱ्यावर व शरीरावर अनेक जखमांच्या खुणा आहेत. व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने सांगितले की, तिला तिच्या कुटुंबीयांनी मारहाण केली.वैष्णवी धनराज अनेक मोठ्या टीव्ही शोचा ( Tv show ) भाग आहे. क्राईम ड्रामा शो सीआयडी, तेरे इश्क में घायाल आणि बेपन्ना यासारख्या लोकप्रिय शोजमध्ये ती झळकलेले आहे. ( vaishnavi dhanraj video )
वैष्णवी धनराजने तिच्यासोबत झालेल्या भांडणाबद्दल बोलताना स्वतःचा एक व्हिडिओ जारी केला आणि सर्वांना मदत करण्याची विनंती केली. अभिनेत्रीने तिच्या चेहऱ्यावर, ओठांवर आणि हातावर झालेल्या जखमांच्या खुणा कॅमेऱ्यात दाखवल्या. वैष्णवी धनराजने सांगितले की, तिने हा व्हिडिओ पोलीस ठाण्यातून शूट केला आहे. (CID tv show )
अभिनेत्रीला बेदम मारहाण
वैष्णवी धनराज व्हिडिओमध्ये म्हणाली, नमस्कार, मी वैष्णवी धनराज आहे. मला आत्ता खरोखर मदतीची गरज आहे. मी सध्या काशिमीरा (मीरा रोड) पोलीस ठाण्यात असून मला माझ्या कुटुंबीयांनी मारहाण केली आहे. मला खूप मारहाण झाली आहे. कृपया मला तुमच्या सर्व मदतीची गरज आहे. मीडिया, न्यूज चॅनेल्स आणि इंडस्ट्रीतील सर्व लोक कृपया या आणि मला मदत करा. ( Actress vaishnavi )
She is #VaishnaviDhanraj, who did TV shows like #CID, #Madhubala, #Bepannaah etc.
Right now she is in #KashimiraPolice station. And she needs help from the media.
I don’t have words to express my gratitude to #MumbaiPolice. You guys are loving, helpful and amazing. Love you❤️ pic.twitter.com/qVTFL0318a
— K Himaanshu Shuklaa (@khimaanshu) December 15, 2023
याआधीही वैष्णवी धनराज शारीरिक अत्याचाराला बळी पडली आहे. अभिनेत्रीला तिच्या लग्नानंतर घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागला होता. वैष्णवी धनराजने 2016 मध्ये अभिनेता नितीन शेरावतसोबत लग्न केले. SpotboyE ला दिलेल्या मुलाखतीत, अभिनेत्रीने खुलासा केला होता की ती घरगुती हिंसाचाराला बळी पडली होती आणि त्यामुळे तिचा घटस्फोट झाला होता.