GAUHAR KHAN – टीव्ही आणि बॉलिवूडमध्ये आपल्या बोल्ड अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेणारी अभिनेत्री गौहर खानने नुकतेच टीव्ही पडद्यावर पुनरागमन केले आहे. तिने आई झाल्यानंतर ब्रेक घेतला होता. प्रदीर्घ काळानंतर पुन्हा गौहर ‘झलक दिखलाजा’ या लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शोमधून होस्ट म्हणून पुनरागमन करत आहे.
View this post on Instagram
अभिनेत्रीला जज म्हणून चाहते खूप पसंत करत आहे. अशात नुकत्याच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, यामध्ये ती एका अवॉर्ड नाईटच्या रेड कार्पेटवर चालताना दिसली. यादरम्यान तिचा तोल गेला अन् ती पडता पडता थोडक्यात बचावली आहे. रेड कार्पेटवर अभिनेत्री स्टायलिश दिसत होती. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
व्हिडीओमध्ये गौहर खान लाइट ग्रेन लाँग गाऊन घातलेली दिसली, तिच्या हातात पुरस्कार होता. दरम्यान, पापाराझींशी बोलताना ती पुढे सरकत होती. त्यानंतर तिचा पाय मागे असलेल्या फ्लेक्स स्टँडमध्ये अडकला आणि तिचा तोल गेला. तिने स्वत:वर नियंत्रण ठेवले आणि पडून थोडक्यात बचावली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी गौहर खान ‘झलक दिखलाजा’च्या सेटवर पडून थोडक्यात बचावली होती. त्या काळातही ती पापाराझींशी बोलताना पटकन व्हॅनिटीकडे चालली होती. त्यावेळी उंच टाचांमुळे अभिनेत्रीचा पाय वळला होता. आता या व्हिडिओवर शोष मीडिया युजर्सकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहे.