आळंदी – इंद्रायणी प्रदुषणमुक्ती आणि समाजप्रोबधनासाठी इंद्रायणीचे उगमस्थान श्रीक्षेत्र कुरवंडे ते श्रीक्षेत्र आळंदी- श्रीक्षेत्र तुळापूर या मार्गावरून इंद्रायणी माता पायी परिक्रमा केली जाणार आहे. या उपक्रमातून इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्तीसाठी इंद्रायणी नदीचे दुतर्फा मुक्कामाचे ठिकाणी कीर्तनाचे माध्यमातून समाज प्रबोधन केले जाणार आहे.
या पायी परिक्रमाचे आयोजन 17 ते 28 डिसेम्बर 2023 या कालावधी करण्यात आले आहे. आळंदीतून या परिक्रमा पालखी सोहळ्याचे प्रस्थान रविवार (दि. 17) हरिनाम गजरात सकाळी 8 वाजता होणार असल्याचे परिक्रमेचे मुख्य संयोजक ह. भ. प. गजानन महाराज लाहुडकर यांनी सांगितले.