मुंबई – अलीबाबा दास्तान-ए-काबुल फेम अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली.प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने मालिकेच्या सेटवर गळफास लावून घेतला. तुनिषा ही केवळ 20 वर्षांची होती.आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नसलं तरी आता पोलिसांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
पोलिसांनी तुनिषाच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. तसेच आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा सहकलाकार शीजान खानला अटक करण्यात आली आहे. शीजानचे तुनिषाबरोबर प्रेमसंबंध होते. या प्रेमाच्या नैराश्येतूनच तुनिषाने ही आत्महत्या केली असं तिच्या आईचं म्हणणं आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी दिली.
Maharashtra | Waliv police arrested actress Tunisha Sharma’s co-star Sheezan Khan by registering a case of abetment to suicide
Tunisha Sharma died by suicide on the set of a TV serial. Her mother has registered a complaint. We are investigating this: ACP Chandrakanth Jadhav pic.twitter.com/QtOubRiU16
— ANI (@ANI) December 24, 2022
नेमकं काय घडलं
तुनिषा सध्या सब टीव्हीच्या दास्तान-ए-काबुल या शोमध्ये मुख्य भूमिकेत काम करत होती. याच मालिकेचं शूटींग सुरू असताना सेटवरील मेकअप रूममध्येच तिने गळफास घेतला. सेटवर उपस्थित लोकांनी तात्काळ अभिनेत्रीला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला पण वाटेतच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवडी रुग्णालयात पाठवण्यात आला होता. पोलिस या घटनेचा कसून तपास करत आहेत.