मुंबई – अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ‘दंबग’ या चित्रपटामुळे प्रसिध्दीच्या झोतात आली. या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. विशेष म्हणजे पहिल्याच चित्रपटात तिला सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटाला प्रेक्षकांचा देखील मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर तिने अनेक चित्रपटात काम केले. तिच्या अभिनयाचे देखील कौतुक झाले. मात्र आता बॉलीवूडमधील यशानंतर सोनाक्षीने मुंबईत स्वत:चे घरं विकत घेतले आहे.
सोनाक्षीने मुंबईतील बांद्रा परिसरामध्ये एका अपार्टमेंटमध्ये घर खरेदी केलं आहे. सोनाक्षीने नवं घरं खरेदी करताच चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. या घराची किंमत तब्बल 11 कोटी असल्याची म्हंटले जात आहे. सोनाक्षीचा फ्लॅट हा 26 व्या मजल्यावर आहे. तब्बल 2 हजार 208 स्क्वेअर फुट असलेल्या या घराचे इंटेरिअर देखील फारच सुंदर आहे. सोनाक्षीचे हे नवं घर समुद्र किनाऱ्या लगतच आहे.
View this post on Instagram
या घरासाठी ऑफिशियल डॉक्युमेंटनुसार सोनाक्षीने 55 लाखांची स्टॅम्प ड्युटी भरली असून 30 हजार रुपये रजिस्ट्रेशन फी दिली आहे. या वर्षी ऑगस्टमध्ये तिनं ही खरेदी केल्याचे सांगण्यात आले आहे सोनाक्षीने यापूर्वी 2021 मध्ये वांद्रे येथे 14 कोटींना 4 BHK घर खरेदी केले होते. आता तिने आणखी एक नवीन घर घेतले आहे.
दरम्यान, सोनाक्षी सिन्हाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तिचे ‘डबल एक्सएल’ आणि ‘दहाड’ हे सिनेमे रिलीज झाले होते. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नाही. आता त्याचा ‘बडे मियाँ-छोटे मियाँ’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.