मुंबई – अभिनेत्री शर्वरी वाघने आपल्या अभिनय करीअरची सुरुवात मॉडेलिंग पासून केली. ती लवकरच बंटी और बबली २ या चित्रपटांमध्ये आपल्याला अभिनय करताना दिसणार आहे. शर्वरीने आपले वेगळे फॉलोअर्स तयार केले आहेत. ती सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असते. शर्वरी सतत आपले फोटो शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असून तिच्या बोल्ड स्टाइलमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.
View this post on Instagram
नुकतंच शर्वरीने तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचे काही फोटो शेअर केले होते यामध्ये ती खूपच फिट दिसत आहे. आपल्या फिटनेसबाबत ती सांगते की, डान्स पहिले प्रेम आहे आणि मी फिटनेससाठीही डान्स करण्याचा आग्रह धरते.
View this post on Instagram
शर्वरी म्हणते,’मला वर्कआउट म्हणून डान्स करायला आवडते आणि ते करताना मला सर्वात जास्त आनंद मिळतो. डिजिटल मीडियावर, मी देशातील सर्व प्रतिभावान डान्सरला काम करताना पाहते आणि सोशल मीडियाच्या मदतीने त्यांच्याशी संपर्क ठेवतो. माझी इच्छा आहे की मी डान्सचे विविध प्रकार नक्कीच शिकेल.’
View this post on Instagram
शर्वरीची इच्छा आहे की ती लवकरच ‘होठों में ऐसी बात मैं दबाके चली आई’, ‘चलते चलते यूं ही कोई’, ‘सलाम ए इश्क मेरी जां’, ‘जब तक है जां जाने जहां’, ‘धक धक करने लगा’ या सुप्रसिद्ध गाण्यांच्या रिमेस्क्समध्ये डान्स करू शकेल.’