मुंबई – टीव्ही अभिनेत्री ‘सरगुन मेहता’ ही क्वचितच पडद्यावर दिसते, जरी ती अनेक गाण्यांच्या अल्बममध्ये दिसली असली तरी सरगुन मेहताने छोट्या पडद्यापासून पंजाबी चित्रपटांपर्यंत खूप मोठा पल्ला गाठला आहे.
नुकतंच सरगुन मेहताचं ‘पता नहीं जी कौन नशा करता है’ हे गाणं रिलीज झालं असून, चाहत्यांनी तिच्या या गाण्यावर प्रचंड प्रेम केले आहे. आता पुन्हा एकदा अभिनेत्री ‘सरगुन मेहता’ तिच्या आगामी पंजाबी चित्रपटात हजेरी लावली असून तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाची रिलीज डेटही चात्यांशी शेअर केली आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाच्या प्रदर्शनाची माहिती देताना सरगुन मेहताने सांगितले की, “सोहरिया दा पिंड आ गया’ हा चित्रपट 29 जुलै 2022 रोजी प्रदर्शित होत आहे. अभिनेत्रीचा हा पंजाबी भाषेतील चित्रपट असेल. सरगुनने चित्रपटाची एक छोटीशी क्लिप सुद्धा शेअर केली आहे.
दरम्यान, सरगुनच्या या नवीन चित्रपटाबद्दल चाहते खूप उत्सुक दिसत असून, शेअर केलेल्या या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव करत आहेत. सोशल मीडियाव रसरगुन मेहताचा स्वतःचा असा मोठा चाहता वर्ग आहे. फॅन्स देखील तिच्या प्रत्येक फोटो आणि व्हिडिओला लाईक्स करत असतात.
“सोहरिया दा पिंड आ गया’ या चित्रपटाचे लेखन अंबरदीप यांनी केले असून दिग्दर्शन क्षितिज चौधरी यांनी केले आहे. क्षितीज हा पंजाबी दिग्दर्शक आहे, ‘जो गोलमाल, दिलदार, मिस्टर आणि मिसेस 420’ सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करण्यासाठी ओळखला जातो.