माद्रिद: जगात सर्वत्र 23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने पुस्तकांबाबतचा अनेक रोचक कहाण्या समोर येत असतात. अशीच काकांच्या गावाचे अनोखी कहानी यानिमित्ताने समोर आली आहे. स्पेनमध्ये एक छोटेसे गाव आहे जे ‘पुस्तकाचे गाव’ म्हणून ओळखले जाते. या गावाची लोकसंख्या फक्त शंभर आहे आणि या गावांमध्ये नऊ विद्यार्थी पुस्तकाची दुकाने मात्र तब्बल अकरा आहेत .त्यांच्या उत्तर-पश्चिम प्रदेशांमध्ये हे उरुईना नावाचे गाव आहे.
छोट्या असलेल्या गावाला हजार वर्षांचा इतिहास असून बाराव्या शतकातील अनेक इमारती या गावांमध्ये आढळतात. या गावातील बहुतेक लोकांनी आपल्या घरालाच पुस्तकाचे दुकान बनवले आहे. या गावाची लोकसंख्या फक्त 100 असली तरी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. हे गाव पाहण्यासाठी आणि गावातील कोणत्याही घरात जाऊन या पुस्तकांच्या दुकानात जाऊन पुस्तके पाहणे आणि वाचणे हा अनेक पर्यटकांचा छंद झाला आहे.
सरकारनेही या गावाला पुस्तकांचे गाव म्हणून अधिकृत दर्जा दिला असून स्पेनच्या पर्यटन नकाशावर या गावाला स्थान देण्यात आले आहे. सरकारी पुढाकाराने 2007मध्ये या प्रकल्पाला सुरुवात केली होती आणि सरकारने त्यामध्ये तब्बल 30 लाख युरो गुंतवणूक केली होती. करोना महामारीच्या कालावधीमध्ये हे गाव पाहण्यासाठी तब्बल 19 हजार पर्यटकांनी भेट दिली होती.