अभिनेत्री पूनम पांडे रुग्णालयात दाखल; मुंबई पोलिसांकडून पतीला अटक

मुंबई : अभिनेत्री पूनम पांडे हिला काल  रात्री उशीरा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली  आहे. तसेच  तिला रुग्णालयात दाखल केल्यानंतर पूनम पांडेचा पती सॅम बॉम्बे याला पोलिसांनी अटक केली आहे. एका वृत्तसंस्थेने मुंबई पोलिसांच्या हवाल्याने  यासंदर्भातील माहिती  दिली आहे.

पूनम पांडे हिला रुग्णालयात का दाखल केलं, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पूनम पांडेच्या तक्रारीनंतर सॅम बॉम्बे याला पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे.

पूनम पांडे हिने पती सॅम बॉम्बे याच्याविरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर वांद्रे पोलिसांनी सॅम बॉम्बे याला अटक केली होती. सोमवारीच सॅम बॉम्बे याला कोर्टात हजर करण्यात आले  होते. कोर्टाने सॅम बॉम्बे याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

याआधीही पूनम पांडे हिने पती सॅम बॉम्बे याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. सप्टेंबर 2019 मध्ये पूनमनं गोव्यात सॅम बॉम्बे याच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. दोन वर्ष लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर सप्टेंबर 2019 मध्ये सॅम बॉम्बे आणि पूनम पांडे विवाहबंधनात अडकले होते. लग्नाच्या अवघ्या 12 दिवसानंतरच पूनम पांडेने  पती सॅम बॉम्बे यांच्यातील वादाचे  प्रकरण समोर आले होते.

गतवर्षी पूनम पांडेनं पती सॅम बॉम्बे याच्याविरोधात छेडछाड, धमकी आणि मारपीट करण्याचा आरोप केला होता. पूनम पांडेच्या तक्रारीनंर गतवर्षीही गोवा पोलिसांनी सॅम बॉम्बे याला अटक केली होती. त्यानंतर जामीनावर सॅम बॉम्बे बाहेर आला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.