मुंबई – अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या फॅशन आणि स्टाइलसाठी अधिक ओळखली जाते. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो ती शेअर करत असते. तिच्या हॉट आणि बोल्ड लुकला चाहत्यांची देखील चांगलीच पसंती मिळत असते. अनेकदा ती अर्जुन कपूरच्या नात्यामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच मलायका आणि अर्जुन कपूर विदेशात फिरायला गेले होते. याचे काही फोटो अर्जुनने सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर आता मलायकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ती घाबरलेली दिसते.
व्हायरल व्हिडिओमध्ये मलायका पावसामध्ये छत्री घेऊ जात असते. मात्र तिच्या बाजूला अचानक काही तरी पडते आणि ती घाबरते. यावेळी तिच्या आजूबाजूला अनेक लोक देखील उभे असतात. मात्र अचानक आवाज झाल्याने ती घाबरून लगेचच गाडीकडे धाव घेते. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून यावर नेटकरी देखील कमेंट करत आहेत. एकाने कमेंट करत लिहिले की, ‘दिदी डर गई, दिदी डर गई,’ तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, ‘या लोकांना रस्त्याने चालण्याची अजिबातच सवय नसल्याने या अशा आवाजांमुळे त्यांना भीती वाटते.’
View this post on Instagram
दरम्यान, 49 वर्षांची ही अभिनेत्री अजूनही 24 वर्षांच्या मुलींपेक्षा सुंदर दिसते. म्हणूच सोशल मीडियावर अभिनेत्रीचा स्वतःचा असा मोठा चाहता वर्ग आहे. अरबाज सोबत घटस्फोट घेतल्यानंतर ती अर्जुन मागील काही वर्षांपासून डेट करत आहे. अनेकांना त्यांची जोडीही आवडते. मात्र अद्याप त्यांनी लग्न न केल्याने चाहते देखील त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहे.