Actress Kranti Redkar । अभिनेत्री क्रांती रेडकर अभिनयासह एक निर्माती, दिग्दर्शिका या भूमिका देखील उत्तमरित्या पार पाडताना दिसत आहे. सोशल मीडियावर देखील क्रांती सक्रिय असल्याचे दिसते. अनेक व्हिडीओ आणि फोटो ती शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या जुळ्या मुलींचा व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र एका सोशल मीडिया युझर्सने केलेल्याला एका कमेंटला क्रांती रेडकरने सडेतोड उत्तर दिल्यामुळे चर्चेत होती तर आता तिच्या एका पोस्टने युजर्सना धक्का बसला आहे. तिला कॉल करून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @mumbaipolice I have been receiving death threats on my mobile number from various Pakistani numbers and a number from the Uk. Just wanted to bring it to your kind notice 🙏 This has been happening since last one year. The police… pic.twitter.com/pdgytGCYRp
— KRANTI REDKAR WANKHEDE (@KrantiRedkar) March 8, 2024
मराठी अभिनेत्री क्रांती रेडकरला फोन कॉल करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत क्रांती रेडकरने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कॉल आलेला नंबर हा पाकिस्तानचा आहे. वृत्त संस्थेने दिलेल्या माहिती नुसार कॉलवर धमक्या आणि अश्लील संदेश पाठवण्यात आले आहे.
वृत्तानुसार क्रांती रेडकरला पाकिस्तानी क्रमांकावरुन ठार मारण्याच्या धमक्या आल्या आहे. तसंच अश्लील मेसेजही पाठवण्यात आले आहेत. या सगळ्या संदर्भात क्रांतीने गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसंच क्रांतीने या सगळ्या प्रकरणी स्क्रिन शॉट पोस्ट केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद फडणवीस आणि मुंबई पोलिसांना टॅग करत या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.
हेही वाचा
मनोज जरांगे यांचं लोकसभा निवडणुकीबाबत म्हणाले,’मराठे फॉर्म भरत आहे त्यांची फजिती होणार…’