मुंबई – अभिनेत्री ‘करिश्मा तन्ना’ टेलिव्हिजनवरील एक स्टायलिश अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर करिश्मा चांगलीच सक्रिय असते. ती सोशलवर नेहमीच आपले वेगळ्या अंदाजात फोटो शेअर करत असते.
मात्र, सध्या करिश्माचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये करिश्मा आपल्या बॉयफ्रेंड वरूण बंगेरा सोबत दिसून येत आहे. याशिवाय तिने वरूणसोबत गुपचूप साखरपुडा केला असल्याचे देखील समजते आहे. आणि आता लवकरच करिश्मा लग्नबेडीत अडकणार आहे.
View this post on Instagram
त्यांच्या कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत हा साखरपुडा झाला आहे. करिश्मा तन्ना आणि वरुण बंगेरा यांची भेट एका कॉमन फ्रेंड सुवेद लोहियाच्या माध्यमातून झाली. तेव्हापासून दोघेही एकमेकांसोबत आहेत. दोघे एकमेकांना डेट करत आहेत. करिश्मा तन्ना आणि वरुण बंगेरा त्यांच्या नात्याबद्दल सीरियस आहेत.
View this post on Instagram
करिश्माने ‘क्योंकी साँस भी कभी बहू थी’ , ‘नागार्जुन: एक योद्धा’ , ‘कयामत की रात’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच अभिनेता रणबीर कपूरच्या संजू या चित्रपटात सुद्धा करिश्माने मुख्य भूमिका साकारली होती. करिश्मा आपल्या फिटनेस कडे विशेष लक्ष देते. ती रोज वर्कआउट आणि योगा करते.