नवी दिल्ली – 5-जी तंत्रज्ञानाविरोधातील प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलासाठी दिलासादायक बातमी आहे. या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायलयाच्या खंडपीठाने सुनावणी केली आहे.
जुही चावलाला ठोठावलेल्या 20 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. आता हा दंड न्यायालयाने कमी करून 2 लाख रुपयांवर आणला आहे. जुही चावला आणि इतर दोघांनी दाखल केलेल्या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. एका आदेशाविरोधात याचिकेत आव्हान देण्यात आले होते. या प्रकरणी 27 जानेवारी रोजी सुनावणी झाली. कोर्टाने दंडाची रक्कम कमी केली, मात्र सेलिब्रेटी या नात्याने जुही चावलाने काही सामाजिक कार्य करावे, अशी अटही घालण्यात आली आहे.
दरम्यान, अभिनेत्री जुही चावलानेदेशात 5G तंत्रज्ञानाचा वापर करण्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. संपूर्ण मानवजाती तसेच निसर्गावर याच्या किरणोत्सर्गाचा परिणाम होईल, हे धोकादायक आहे, असे तिने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते.