मुंबई : काही दिवसांपूर्वीच लोकप्रिय मालिका ‘पवित्र रिश्ता’ फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा प्रियकर विकी जैन सोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. अंकिता-विकी यांचा वविवाह मुंबईतील एका नामांकित हॉटेलमध्ये अतिशय राजेशाही थाटात पार पडला.
या विवाह सोहळ्याला अनेक बॉलिवूड आणि टीव्ही कलाकारांनी हजेरी लावली होती. तसेच अनेकांनी या नवविवाहित जोडप्याला सोशल मीडियाद्वारे आणि प्रत्यक्ष रित्या शुभेच्छा दिल्या. नुकतंच अंकिताचा एक व्हिडिओ सोशलवर व्हायरल झाला असून, यात ती आपल्या सासरी असल्याचे दिसून येत आहे.
View this post on Instagram
लग्नानंतर विकी जैनच्या कुटुंबीयांनी एक पूजा ठेवली होती. या पूजेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिताच्या सासूबाई तिला ‘लवकरच गूड न्यूज द्या..!’ असे बोलताना दिसत आहेत.
View this post on Instagram
हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. अनेकांनी ‘अंकिता आता लवकरच गूडन्यूज देणार’ असे म्हटले आहे. तर काही नेटकऱ्यांनी तिला आतच शुभेच्छा द्यायला सुरुवात केली आहे.