निगडी, (प्रतिनिधी) – कला जोपासण्याला कोणतेही वय नसते, हे दाकवून देण्यासाठी प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या कलाकरांनी प्रेमाचे गहिरे रंग उलगडणार्या ‘प्रेमा तुझा रंग कसा’ हा नाट्यप्रयोग सादर केला. या नाट्य प्रयोगाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला . या नाटकाचा प्रयोग अत्यंत नेटका, बहारदार आणि व्यावसायिक नाटकाच्या तोडीचा होता, असे मत प्रेक्षकांनी प्रत्यक्ष भेटून व्यक्त केले.
या नाटकात ज्योती कानेटकर, सुभाष भंडारे, अनुराधा पेंडुरकर, चंद्रशेखर जोशी, सुनिता येन्नूवार, सतीश सगदेव व अशोक अडावदकर यांनीर्ळींर्ळींऊ पात्रांच्या भूमिका साकारल्या. अशोक अडावदकर यांनी दिग्दर्शन केले.
माजी उपमहापौर शैलजा मोरे यांच्या हस्ते कलाकारांचा सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. याकरिता नाट्य समिती प्रमुख डॉ.ज्योती इंगोले यांचे सहकार्य लाभले.
पन्नास वर्षांपूर्वी ज्यांनी ह्या नाटकात भूमिका केल्या होत्या अशा 3 कलाकारांचा यथोचित गौरव करण्यात आला. त्यामुळे पूनःप्रत्ययाचा आनंद त्यांना मिळाला. ह्या नाटकाचे गारुड , इतक्या कालावधीनंतर सुध्दा रसिकांवर आहे हेच सिद्ध झाले.