मुंबई – अभिनेता सनी देओलचा 2001 साली प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेम कथा’ या सिनेमाला मोठे यश मिळाले. या चित्रपटात सनीसह अभिनेत्री अमीषा पटेल मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटातील सर्व कलाकरांच्या अभिनयाने आणि कथानकाने सर्वांच्या मनात घर निर्माण केले. गदरच्या यशानंतर तब्बल 22 वर्षांनी ‘गदर’ या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
सध्या या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने करोडो रुपयांची कमाई केली आहे. सिनेमाने आता पर्यंत अनेक मोठमोठ्या सिनेमांचा रेकॉर्ड मोडले आहेत. ‘गदर 2’ ला रिलिज होऊन आता आठ दिवस झाले असले तरी या सिनेमाची क्रेझ काही केल्या कमी होतांना दिसत नाही आहे.
मात्र, अश्यातच अभिनेता सनी देओल संबधित एक मोठी बातमी समोर आली आहे. सनी देओल आणि त्याच्या सिनेमांना पाकिस्तानात बंदी आहे. पाकिस्तानातील सिनेमागृहात अभिनेत्याचे सिनेमे दाखवले जात नाहीत.
सनी देओलने देशप्रेमावर आधारित अनेक सिनेमे केले आहेत. तसेच पाकिस्तानाचा विरोध करणाऱ्या भूमिका त्याने साकारल्या आहेत. त्यामुळे त्याच्या सिनेमांचे शो न ठेवण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने याबद्दल माहिती दिली आहे.
सनी देओलचा ‘गदर : एक प्रेम कथा’ हा सिनेमा 2001 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात त्याने साकारलेली तारा सिंहची भूमिका चांगलीच गाजली. भारतीय सिनेरसिकांनी तारा सिंहला डोक्यावर घेतलं असलं तरी पाकिस्तानी सिनेप्रेमींना मात्र सनीचं काम आवडलेलं नाही. आणि त्यामुळेच आता सनी देओल आणि त्याच्या सिनेमांना पाकिस्तानात बंदी घालण्यात आली आहे.