अभिनेता सुनील शेट्टी ‘नाडा’चा ब्रॅण्ड अँम्बेसेडर

नवी दिल्ली : बाॅलिवूड अभिनेता सुनील शेट्टीला राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्थेचा (नाडा) ब्रॅण्ड अँम्बेसेडर म्हणून घोषित करण्यात आलं आहे. संस्थेला अशी आशा आहे की, सुनिल शेट्टी याच्या लोकप्रियतामुळे क्रीडा स्पर्धेत डोपिंगचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. दरम्यान, देशामध्ये क्रीडा स्पर्धांमध्ये अनेक उत्तेजक द्रव्याचा वापर केला जातो. यावर्षी १५० हून अधिक खेळाडू डोपिंग चाचणीमध्ये दोषी ठरले होते. यामध्ये बाॅडी बिल्डर्स खेळाडूचे प्रमाण अधिक आहे.

‘नाडा’चे महानिदेशक नवीन अग्रवाल याबाबत म्हणाले की,”डोपिंग हे खेळाडूला स्वत: साठी आणि देशासाठी नुकसानकारक आहे” असा संदेश खेळाडूपर्यत पोहचण्यास प्रसिध्द अभिनेता सुनिल शेट्टी योग्य राहिल. आम्हाला अस वाटत की, कोणत्याही देशात अभिनेत्याला फाॅलो करणारे आणि त्याला मानणारे लोक जास्त असतात. त्यामुळे कोणत्याही माजी खेळाडू किंवा वर्तमान खेळाडूच्या तूलनेत अभिनेत्यांने दिलेला संदेश जास्त प्रभावी ठरू शकेल.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होण्यास खूप कमी कालावधी उरला आहे. त्यातच जागतिक अँटी डोपिंग एजन्सी (वाडा)ने यंदाच्या वर्षाच्या सुरूवातीला नाडा प्रयोगशाळेला निलंबित केलं आहे. त्यामुळे नाडा जी नमूने एकत्रित करेल ते भारताबाहेर परीक्षणासाठी पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून भारतीय नाडाने अभिनेता सुनील शेट्टीची नाडा ब्रॅण्ड अँम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.