नवी दिल्ली – नेपाळमधील प्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिर आज भाविकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले. मंदिरातील नव्या दागिन्यांच्या घडवण्यामध्ये गैरव्यावहार झाल्याचा आरोप होऊ लागला आहे. या मंदिराच्या आवारातून सोन्याची झल्लरी गायब होण्याचा तपास देशाच्या तपास संस्थानी सुरू केला आहे. त्यानंतर हे मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मंदिराच्या आवारातून सुमारे 100 किलो सोन्याच्या दागिन्यांमधून 10 किलो सोन्याचे दागिने गायब झाल्याचा आरोप झाल्यामुळे अधिकाराच्या गैरवापराच्या तपासाच्या आयोगाने तपासासाठी मंदिराचा ताबा घेतला होता. त्यामुळे रविवारी हे मंदिरा भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते.
गेल्या वर्षी महाशिवरात्रीला पशुपतीनाथ शिवलिंगावर सोन्याची झल्लरी बसवण्यात आली होती. ही झल्लरी गायब असल्याचा आरोप झाला होता.’सीआयएए’च्या अधिकाऱ्यांनी मंदिरातील दागिन्यांच्या वजन केले. दागिन्यांचे वजन करण्याचे काम रविवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून सोमवारी रात्री 2 वाजेपर्यंत चालले होते.
दागिन्यांच्या तपासणीचे काम अजूनही पूर्ण झालेले नसून अद्याप कोणताही निष्कर्ष काढता येऊ शकलेला नाही, असे आयोगाच्या प्रवक्त्यांनी सांगितले. या तपासणीबाबत गोपनीयता राखण्यात आली आहे. अशात पशुपतीनाथ मंदिर आज भाविकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले