मुंबई – डान्सर आणि अभिनेत्री नोरा फतेही सध्या ‘झलक दिखला जा 10’ या डान्स रिअॅलिटी शोला जज करत आहे. नोरा फतेहीने चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.
View this post on Instagram
ती तिच्या किलर डान्स मूव्ह्सने चाहत्यांच्या मनावर राज्य करताना दिसत आहे. ‘झलक दिखला जा 10’ च्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये नोरा फतेहीचा डान्स पाहून माधुरी दीक्षितही स्वतःला शिट्टी वाजवण्यापासून रोखू शकली नाही.
View this post on Instagram
कलर्स टीव्हीच्या पेजवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये नोरा फतेही हिरव्या रंगाची नऊवारी साडी, नाकात सोनेरी नथ आणि हेवी वर्क ज्वेलरी परिधान करताना दिसत आहे. अमृता खानविलकर यावेळी लावणी डान्स सादर करून शोमध्ये परफॉर्म करणार आहे.
View this post on Instagram
माधुरीला लावणी नृत्याची आवड आहे. अमृताचा परफॉर्मन्स संपल्यावर, माधुरीने नोरा फतेहीला स्टेजवर अमृतासह लावणी नृत्य करण्याची विनंती केली. दरवेळीप्रमाणे यावेळेसही नोरा लावणीने डान्स सादर करून सर्वांची मने जिंकली.
View this post on Instagram
निर्मात्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये नोरा फतेहीच्या चेहऱ्यावरील भाव अप्रतिम दिसत आहेत. माधुरी दीक्षित देखील अभिनेत्रीच्या अभिनयाचा खूप आनंद घेताना दिसत आहे. नोरा फतेहीचा परफॉर्मन्स संपताच, माधुरी दीक्षित जोरात शिट्ट्या वाजवते आणि आनंदाने तिला स्टँडिंग ओव्हेशन देते. नोरा फतेहीच्या डान्स मूव्हज सगळ्यांना खूश करतात असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. नृत्य प्रकार कोणताही असो, नोरा फतेही प्रत्येक वळणावर जिंकते.