मुंबई – टीव्ही जगतात जर एखादा कॉमेडी शो असेल जो लोक खूप दिवसांपासून पाहत असतील तो शो म्हणजे “तारक मेहता का उल्टा चष्मा’. या शोचे चाहते जगभरात आहेत. इतकेच नाही तर या शोमधील कलाकारांना लोक खूप प्रेम देतात. मात्र, काही महिन्यांपूर्वीच या मालिकेतील एका महत्वाच्या अभिनेत्यानं 14 वर्षांनंतर या मालिकेचा निरोप घेतला आहे.
आणि ते नाव म्हणजेच, अभिनेता ‘शैलेश लोढा’ या मालिकेत शैलेश यांनी ‘तारक मेहता’ हे पात्र साकारलं होत. त्यांच्या कलेला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं. मात्र, आता त्यांची जागा अभिनेता ‘सचिन श्रॉफ’ याने भरून काढली आहे. शैलेश लोढा यांचे मानधन निर्मात्यांकडून देण्यात आले नाही आणि त्यांनी मालिका सोडून दिली. असं देखील सांगण्यात आलं.
मात्र, आता पुन्हा एकदा शैलेश लोढा यांचे नाव चर्चेत आलं आहे. त्याच कारण देखील तितकंच खास आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेचा निरोप घेतल्यानंतर शैलेश लोढा लवकरच अभिनेता सलमान खान याच्या वादग्रस्त शो ‘बिग बॉस 17’ मध्ये दिसणार आहे. शैलेश लोढा ‘बिग बॉस 17’ मध्ये स्पर्धकाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा रंगत आहे.
View this post on Instagram
शैलेश लोढा यांच्या ‘बिग बॉस 17’ मध्ये स्पर्धकाच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती ‘bigboss_17_updates’ नावाच्या इंस्टाग्राम पेजने दिली आहे. अशात अभिनेत्याला पुन्हा छोट्या पडद्यावर पाहता येणार असल्यामुळे चाहते देखील उत्सुक आहेत. पण आतापर्यंत रिअॅलिटी शोच्या निर्मात्यांनी किंवा अभिनेत्याने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे याबद्दल अधिक कोणतीही माहिती समोर आलेली नाही.