राज्यात सुरु असलेल्या राजकीय उलथापालथीचा काल शेवट झाला. भाजपने मास्टरस्ट्रोक खेळत थेट बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली. तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सर्वांनीच कौतुकाचा वर्षाव केला.
धर्मवीर फेम अभिनेता प्रसाद ओकने देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करत सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये प्रसादाने धर्मवीर चित्रपटाच्या प्रमोशनमधील आनंद दिघे यांच्या गेटअपमध्ये असलेला एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. तसेच दुसऱ्या फोटोमध्ये एकनाथ शिंदे हे मंदिरात देवाला हात जोडताना दिसत आहेत.
View this post on Instagram
प्रसादाच्या या पोस्टची सध्या जोरदार चर्चा आहे. तसेच या पोस्टमध्ये प्रसादने मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना कोटी कोटी शुभेच्छा असे कॅप्शन देखील दिले आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच शिंदे यांच्यावर राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी कौतुकाचा वर्षाव केला होता. तसेच सोशल मीडियावरून देखील शिंदे यांचे अनेकांनी अभिनंदन केल्याचे पाहायला मिळाले होते.
— Raj Thackeray (@RajThackeray) June 30, 2022
श्री. एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन! महाराष्ट्राच्या हिताची जपणूक त्यांच्याकडून होईल अशी सार्थ अपेक्षा व्यक्त करतो.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 30, 2022
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झालेले मा. @mieknathshinde जी आणि उपमुख्यमंत्री पद भूषवणारे @Dev_Fadnavis जी यांचं मनःपूर्वक अभिनंदन! हे नवीन सरकार राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यासहित राज्याच्या विकासाचा गाडा देखील वेगानं पुढे हाकतील, अशा सदिच्छा व्यक्त करतो.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 30, 2022