तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन महाराष्ट्र इन्स्टिटयूट ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजीच्या वतीने विहंगम २०२३-२४ मध्ये अभिनेते क्षितिज दातें यांना टिळक – विजापूरकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
संस्थेचे सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, संस्थचे खजिनदार राजेश म्हस्के यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. संस्थेचे विश्वस्त महेश शहा, मुख्य कार्यकारी संचालक डॉ. रामचंद्र जहागीरदार, प्रा. डॉ. विलास देवतारे, प्राचार्या डॉ. अपर्णा पांडे आदी उपस्थित होते.
कला क्रीडा, शैक्षणिक आणि सांस्कृतिक यांची लयलूट असलेल्या विहंगम २०२३-२४ या कार्यक्रमाची सुरवात अभिनेते क्षितीज दाते यांच्या हस्ते रंगमंच पूजनाने झाली.
या वेळी डॉ. सागर जोशी, प्रा. प्रीतम अहिरे, सुधाकर ढोरे, प्रीती घुले यांना शिक्षण महर्षी कृष्णराव भेगडे कार्यगौरव पुरस्कार २०२३-२४ ने वर्षभरातील कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. शेखर रहाणे यांनी केले. आभार डॉ. सतीश मोरे यांनी मानले.