मुंबई – अंमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपावरून दूचचित्रवाणी मालिकेत काम करणारा अभिनेता गौरव दीक्षित याला शुक्रवारी अमली पदार्थ नियंत्रण पथकाने (एनसीबी) मुंबईत अटक केली. गौरवच्या निवासस्थानावर टाकलेल्या या छाप्यात एमडी ड्रग्स, चरस आणि अन्य अंली पदाथर जप्त केले आहेत. अभिनेता एजाज खान ड्रग्स प्रकरणातील चौकशीच्या आधारे गौरववर कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
ड्रग्स प्रकरणात एनसीबीने एजाज खानला मार्च महिन्यात अटक केली होती. ड्रग्स प्रकरणात ड्रग पेडलर शादाब बटाटा याला अटक केल्यानंतर अभिनेता एजाज खानचे नाव समोर आले होते. एजाज खानवर शादाब बटाटा यांच्या टोळीचा भाग असल्याचा आरोप आहे. शादाब बटाटा हा मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्स सप्लायर फारुख बटाटा याचा मुलगा आहे. दरम्यान, एनसीबीने यापूर्वी जेव्हा शादाब बटाटाला याला अटक अटक केली होती तेव्हा सुमारे 2 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त करण्यात आले होते.
शादाब बटाटावर मुंबईतील बॉलिवूड सेलिब्रिटींना ड्रग्स पुरवल्याचा आरोप आहे. फारुख सुरुवातीला बटाटे विकायचा. त्यानंतर तो अंडरवर्ल्डच्या काही लोकांच्या संपर्कात आला आणि मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्स सप्लायर झाला. एनसीबीचे एक अधिकारी म्हणाले कि, आम्ही गौरवला शोधतच होतो. अखेर शुक्रवारी त्याला अटक करण्यात आली आहे. आता कोठडीसाठी न्यायालयात त्याला हजर केले जाईल.
यापूर्वी एप्रिल महिन्यामध्ये गौरव दीक्षित यांच्या मुंबईतील लोखंडवाला येथील निवासस्थानी छाप्यात त्यांना अंमली पदार्थ सापडले होते. मात्र, तेव्हा तो घरी नव्हता. त्यानंतर एनसीबीनंतर त्याला आरोपी म्हणून घोषित केले आणि ते त्याच्या शोधात होते.