मुंबई – युवा अभिनेता आदित्य सिंग राजपूत आज (22 मे) दुपारी त्याच्या घराच्या बाथरुममध्ये मृतावस्थेत आढळून आला. आदित्यच्या अचानक जाण्याने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. आदित्य सिंग राजपूत मुंबईतील एक लोकप्रिय अभिनेता, मॉडेल आणि कास्टिंग कोऑर्डिनेटर होता.
तो त्याच्या अंधेरीतील 11व्या मजल्यावरील उंच इमारतीच्या बाथरुममध्ये मृतावस्थेत आढळला. त्याच्या मित्राला तो मृतावस्थेत दिसून आल्यानंतर त्याने इमारतीच्या चौकीदाराला सोबत घेत जवळच्या रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी आदित्यला मृत घोषित केले. मुंबई पोलिसांनी आदित्य सिंगचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोलिसांनी मृत्यूचे कारण ड्रग्जचे अतिसेवन असल्याची भीती व्यक्त केली आहे.