मुंबई – अमली पदार्थ विरोधी नियंत्रण कक्षाने बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शनवर पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करून कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये आता बिग बॉसचा फेम अभिनेता ‘अरमान कोहली’ याला अटक करण्यात आली आहे.
शनिवारी (दि. 28) अरमान कोहलीच्या घरावर छापा टाकून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. यावेळी रात्री उशिरापर्यंत आरमान कोहलीवर प्रश्नांचा भडीमार सुरु होता. एनसीबीला गेल्या काही दिवसांपासून मुंबईत ड्रग्जबद्दल बरीच माहिती मिळाली होती.
त्यानंतर एनसीबीनं एक ऑपरेशन सुरू केलं आणि त्याला ‘रोलिंग थंडर’ असं नाव दिलं. आणि याच रोलींग थंडर अंतर्गत अभिनेता अरमान कोहलीच्या घरावर छापा टाकला.
एनसीबीकडून आतापर्यंत ड्रग्स प्रकरणात अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींची चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे आता अरमान कोहली नंतर आणखी किती महत्त्वपूर्ण माहिती समोर येणार हे महत्वाचे आहे.
यापूर्वी सुद्धा ‘अरमान कोहली’ला अटक करण्यात आली होती…
बिग बॉस या लोकप्रिय शोमध्येही अरमान कोहली याने भाग घेतला होता. बेकायदा दारुसाठा केल्याप्रकरणी त्याला याआधी अटक करण्यात आली आहे. 2018 मध्ये अरमान कोहलीवर त्याची लिव्ह इन गर्लफ्रेंड नीरू रंधावा हिला बेदम मारहाण केल्याचा आरोप झाला होता. त्यावेळीही त्याला अटक करण्यात आली होती.