अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या परराज्यातील 11 वाहनांवर कारवाई

अवैध बांधणी असणाऱ्या बस मधून प्रवास टाळा – स्टीव्हन अल्वारीस
कोल्हापूर :  अवैध प्रवाशी वाहतुक करणाऱ्या परराज्यातील 11 वाहनांवर परिवहन विभागामार्फत कारवाई करण्यात आली आल्याची माहिती  प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस यांनी दिली.
अरुणाचल प्रदेश (AR), नागालँड (NL), गुजरात (GJ) इत्यादी राज्यांमध्ये नोंदणी झालेल्या अवैध बसेस कोल्हापूरमध्ये आढळून आल्या आहेत. या बसेस महाराष्ट्राचा कर भरत असल्या तरी त्या वाहनांची लांबी प्रमाणापेक्षा जास्त आहे.
वाहनाचा ओवर हँग जास्त आहे. वाहनांमध्ये 32 च्या ठिकाणी 36 स्लीपर आहेत. करिता सदर वाहनांची बांधणी नियमबाह्य आहे. वाहनातून प्रवास करणे धोकादायक असून प्रवाशांनी अशा वाहनांतून प्रवास करू नये असे आवाहन डॉ. अल्वारीस यांनी केले.
अशा नियमबाह्य प्रवाशी वाहतुक करणाऱ्या वाहनांवर आररटीओ विभागाने कारवाई सुरू केली असून कारवाईला घाबरून बस मालकांनी सदर वाहने रस्त्यावर आणणे बंद केले आहे.
या वाहनांचे फिटनेस रद्द करण्या आले असून  कारवाई झालेल्या वाहनांमध्ये वैभव ट्रॅव्हल्स,  एम बी लिंक, परिक ट्रॅव्हल्स, संगीता, सनराइज, हर्षाली, नॅशनल ट्रॅव्हल्सचा इत्यादींचा समावेश आहे.
प्रवाशांनी आपल्या वाहनाचा नोंदणी क्रमांक तपासावा व सदर नोंदणी क्रमांक AR, NL,GJ असा असेल तर अशा वाहनातून प्रवास करू नये. आरटीओ कार्यालयाला [email protected] या वेबसाईटवर ट्रॅव्हल्स चे नाव, वाहनाचा क्रमांक, तारीख, वेळ, आपले तिकीट, आपले नाव, पत्ता मोबाईल नंबर यासह तक्रार नोंदवावी, असे आवाहन डॉ अल्वारिस यांनी केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.