मुलाच्या मृत्यूच्या दु:खावर दगड ठेवून ते बुजवताहेत खड्डे

फरिदाबाद येथील दूरसंचार अभियंत्याचा उपक्रम; प्रसासन मात्र सुस्त

फरीदाबाद : माझा मुलगा तर मी गमावला, आपलं बछडं गमावण्याचं दु:ख काय असतं हे मी जाणतो… माझं गेलं पण इतरांची तरी वाचायला हवीत ना… ही भावना आहे मनोजकुमार वाधवा यांची… त्यातूनचे ते स्वत: फरिदाबादमधील रस्त्यांवरील खड्डे बुजवत आहेत. प्रशासनाची वाट न पाहता…

वाधवा यांचा पुत्र 
वाधवा यांचा पुत्र

वाधवा हे टेलिकॉम इंजिनिअर. ते फरिदाबादमध्ये राहतात. सहा वर्षापुर्वी त्यांच्या तीन वर्षाच्या मुलाचा अपघातात मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नीला 23 शस्त्रक्रियांना सामोरे जावे लागले. 10 फेब्रुवारी 2014ला एक विवाह समारंभ आटोपून घरी परत येत होते. त्यावेळी खड्ड्यामुळे त्यांचा दुचाकीवरील तोल गेला. त्यात त्यांचा चिमुरडा एका अणुकुचिदार दगडावर आपटला. तर पत्नी पवित्राही गंभीर जखमी झाली. दोघांना तातडीने खासगी रुग्णालयात रुग्णालयात नेण्यात आले. तेथे मुलाचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले.

खड्डे भरणारे सहकारी 
खड्डे भरणारे सहकारी

या घटनेनमथर खचून न जाता त्यांनी खड्डे बुजवण्याच्या पध्दतीचे धडे घेतले. असे अपघात पुन्हा होऊ नये म्हणून त्यांनी प्रजासत्ताक दिनापासून खड्डे भरण्याच्या मोहीमेस सुरवात केली. उत्तर प्रदेस सरकारला जाग यावी, म्हणून आम्ही प्रजासत्ताक दिन निवडला. जर आमच्या सारखे काही जण खड्डे बुजवू शकतात तर सरकारी यंत्रणा आणि कंत्राटदार हाताशी सर्व सामुग्री असताना का करू शकत नाहीत, असा सवाल वधवा यांनी केला.

जर दिल्ली आग्रा महामार्गावर एकही खड्डा नसता तर माझा मुलागा आज कदाचित जीवंत असता, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान वधवा यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि खासगी कंपनी लार्सन टुब्रोविरोधात न्यायलयीन लढाई सुरू केली आहे. आपल्या मुलाच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या खड्ड्यांची जबाबदारी निश्‍चित करावी, अशी त्यांची मागणी आहे.

 

 

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
1 Comment
  1. Bala says

    Very nice

Leave A Reply

Your email address will not be published.