नवी दिल्ली: महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे दिल्लीत भाजपचा प्रचार करत आहेत. दिल्ली विधासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि आम आदमी पार्टी यांच्यात चांगचे शाब्दिक युद्ध रंगले आहे. दरम्यान अरविंद केजरीवाल यांनी तावडेंवर कणखर टीका केली आहे.
केजरीवाल म्हणाले, विनोद तावडेजी हे महाराष्ट्रातील माजी शिक्षणमंत्री असून त्यांनी १३०० सरकारी शाळा बंद केल्या आहेत आणि आता ते दिल्लीत भाजपचा प्रचार करण्यासाठी आले आहेत. माझे दिल्लीवासी, आपण सरकारी शाळा विलक्षण बनविण्यासाठी खूप कष्ट केलेत त्यांना शाळा दाखवा, छोले भटूरे खायला द्या आणि त्यांना दिल्ली दर्शनाला न्या, ते आपले पाहुणे आहेत.