मुंबई – छत्रपती संभाजी नगर येथील आमदार संजय शिरसाट यांनी दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर अर्वाच्य भाषेत टिका केली होती. यावरुन आता राजकारण तापायला सुरवात झाले असून अंधारे यांनी शिरसाट यांच्या विरोधात महाराष्ट्र राज्य महिला आयोगात विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
सुषमा अंधारे सगळ्यांनाच माझा भाऊ म्हणतात, पण त्या बाईने काय-काय लफडी केली आहेत, तिलाच माहिती, अशी टीका शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या सभेत बोलताना केली होती. त्यांच्या या विधानानंतर विविध स्तरावरून प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली असून ट्वीट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
सुप्रिया सुळे यांचे ट्विट
अनेक महापुरुषांचा वैचारिक वारसा असणारे महाराष्ट्र हे अत्यंत सभ्य, सुसंस्कृत राज्य आहे. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. ज्या शिवरायांनी परस्त्री ही मातेसमान मानली,त्या शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अवमान होतो ही खेदाची बाब आहे. राजकारणात कितीही तीव्र विरोध असला तरीही…
— Supriya Sule (@supriya_sule) March 31, 2023