नारायणगाव -नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निमगाव सावा परिसरातील तीन ठिकाणी विदेशी दारू आणि बियर विक्री करणाऱ्या तीन जणांवर कारवाई करून 3 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
स्वप्नील महादेव मोरे (रा. वडगाव आनंद, ता. जुन्नर), नासीर हसन इनामदार (रा. निमगाव सावा), भाऊ सखाराम घोडे (रा. घोडेमळा, निमगावसावा) या तिघांवर सोमवारी (दि. 29) गुन्हा दाखल केला आहे. फिर्याद पोलीस शिपाई अतुल मारुती भेके आणि पोलीस शिपाई स्वप्नील मच्छिंद्र लोहार यांनी दिली आहे.