नारायणगाव -पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथील वाणी मळ्यातील एक तरुण सोमवारी (दि. 29) करोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. हे गाव तालुका प्रशासनाने कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. तालुक्यात करोना बाधितांची संख्या 68 वर गेली आहे, अशी माहिती तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी दिली.