जळोची -बारामती शहरातील महावीर पथ येथील एका साडीच्या दुकानाचे शटर उचकटून 19 हजार रुपयांच्या साड्या चोरून नेणाऱ्या चार महिलांना पोलिसांनी दोन महिन्यांनंतर जेरबंद केले आहे.त्यांच्याकडून 19 हजार 160 रुपये किंमतीचा चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.
आरती शंकर पाथरकर (वय 25), सारिका लाला भाले (वय 30), दुर्गा आकाश साळुखे वय (वय 25), शकिला इस्माईल कुरेशी (वय 22) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या घटनेबाबत दि. 12 एप्रिल 202 रोजी शहर पोलीस ठाण्यात तक्रर दिली होती. त्यानुसार तपास करत असताना आमराई परिसरातील चार महिलांना ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक पद्मराज गंपले, योगेश शेलार, सहाय्यक फौजदार संदिपान माळी, पोलीस नाईक ओंकार सिताप, अकबर शेख, उमेश गायकवाड यांनी केली.