जळोची -बारामती शहरातील इंदापूर रोडलगत आमराई भागात मटका चालवणाऱ्या विजय राजेंद्र सावंत, नितीन प्रताप बगाडे (दोघे. रा. आमराई) यांच्यासह महेश सोनवणे (रा. दौंड) यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान माळेगाव बुद्रुक येथील लकडेनगरमध्ये हातभट्टी अड्ड्यावर कारवाई करीत संदीप शंकर गव्हाणे (रा.माळेगाव बुद्रुक) व हातभट्टी दारूसाठी लागणारा कच्चामाल पुरवणाऱ्या किराणा दुकानदाराविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही कारवाईत मिळून 37 हजार 240 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई अपर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या अधिपत्याखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप गोसावी, हवालदार सुरेश भोई, तानाजी गावडे, पोलीस नाईक आप्पा दराडे, वैभव साळवे, रमेश केकाण, गणेश काटकर, राहुल लाळगे, पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत गोसावी यांनी केली आहे.