World Olympic Wrestling Qualifiers 2024 : कुस्तीपटू निशा दहियाची ऐतिहासिक कामगिरी….

World Olympic Wrestling Qualifiers 2024: – भारतीय महिला कुस्तीपटू निशा दहिया हिने शुक्रवारी जागतिक ऑलिम्पिक खेळ पात्रता फेरीदरम्यान पॅरिस ऑलिम्पिकसाठी देशाला कोटा मिळवून दिला आहे. या वर्षी जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी कोटा मिळविणारी निशा ही पाचवी भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे.
निशाने 68 किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठली आहे. निशाने उपांत्य फेरीत रोमानियाच्या अलेक्झांड्रा उंघेलचा 8-4 असा पराभव केला. त्यामुळे कुस्तीपटू निशा दहिया ही भारतासाठी महिला कुस्तीमधील पाचवा पॅरिस ऑलिम्पिक कोटा जिंकणारी पहिली कुस्तीपटू ठरली आहे, जी भारतासाठी एक ऐतिहासिक कामगिरी आहे.
पाचही कोटा महिला कुस्तीपटूंनी मिळवले आहेत. अंतिम पंघाल (53kg) ने 2023 जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताचा पहिला कोटा जिंकला, तर विनेश फोगट (50kg), अंशू मलिक (57kg) आणि रितिका हुडा (76kg) यांनी गेल्या महिन्यात बिश्केक येथे झालेल्या आशियाई पात्रता स्पर्धेत भारतासाठी कोटा मिळवला.



