जुन्या भांडणातून पिरंगुटमध्ये खून
Updated On:

पिरंगुट -जुन्या भांडणाच्या रागातून एकाचा खून झाला आहे. संजय अरविंद गोळे (वय अंदाजे 38, रा. गोळेआळी, पिरंगुट) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी मयताचे दाजी योगेश गणपत तोंडे यांनी फिर्याद दिली आहे. पौड संजय अरविंद गोळे आणि त्यांच्या भावकीत जुनी भांडणे आहेत.
काल रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास संजय यांना आरोपी पूनम गोळे, शुभम गोळे, शंतनु गोळे व इतर दोघा अनोळखी लोकांनी जुन्या भांड्याचे कारणावरून मारहाण केली. त्यात संजयचा मृत्यू झाला. पूनम गोळे यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिल लवटे हे करीत आहेत.





