फलटण – राज्य शासनाच्या परिवहन (आरटीओ) विभागात नोकरीला लावतो असे सांगून फलटण तालुक्यातील युवतीला सव्वा कोटींचा चुना लावणार्या भामट्याला फलटण शहर पोलिसांनी अटक केली आहे. प्रमोद हरीचंद्र रनवरे (मलठण, ता. फकटण) असे अटकेतील संशयिताचे नाव असून योगीता शिवाजी गुंजवटे (रा. झिरपवाडी ता.फलटण) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रमोद याने 2009 सालापासून योगिता यांना आरटीओ मध्ये नोकरीला लावतो असे सांगून तिच्या वडीलांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे उखळले. तसेच नियुक्तीची खोटी पत्रे पाठवून योगिता व तिच्या वडिलांची फसवणूक करून एक कोटी 25 लाखांची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर योगीताने फलटण शहर पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात फिर्याद दिली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊळ करीत आहेत.