बारामती, (प्रतिनिधी) – काटेवाडी (दीपनगर) (ता. बारामती) येथील सुनील गोफणे याची बलात्कार ,ॲट्रॉसिटी, पोस्कोमधील आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सत्र न्यायाधीश जे. ए. शेख यांनी आरोपीला निर्दोष मुक्त केले.
दरम्यान, उलट तपासात काही महत्त्वपूर्ण बाबी साक्षीदारांकडून कोर्टापुढे आल्या. पीडितेचे तिचे लग्न जमले होते. पण ते आरोपीमुळे मोडले. पीडित व आरोपी हे वेगवेगळ्या जातीचे आहेत. त्याचा राग पीडितेच्या घरच्यांना होता. ते एफआयआर दाखल करण्याचे मुख्य कारण आहे, असे न्यायाधीशांसमोर आले.
वैद्यकीय अहवालातदेखील पीडितेला जखमा, दुखापत दिसून आल्या नाहीत. पण शारिरीक संबंध असल्याचा निष्कर्ष वैद्यकीय अहवालात कोर्टासमोर आला.
सुनील गोफणे यांच्याविरुद्ध वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे (दि,७) मार्च २०१९ रोजी गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा पीडितेच्या आईने दाखल केला होता. आरोपीला दि. १५ मार्च २०१९ रोजी अटक केली होती. आरोपीने जामीन दाखल केले. परंतु पीडितेने प्रत्येक वेळेस जामीनाला विरोध केला. पीडितेचे वय तेरा असल्याने आरोपीचा जामीन उच्च न्यायालयाने देखील नामंजूर केला होता.
प्रकरणात फिर्यादी पक्षाने एकूण नऊ साक्षीदार तपासले. त्यापैकी एकही साक्षीदार फितूर झाला नव्हता. पीडित व तिचे आई-वडील, तीन सरकारी पंच, एक डॉक्टर, दोन तपास अधिकारी असे एकूण ९ साक्षीदार तपासले.
तपास अधिकारी यांनी तपास केला. परंतु आरोपी यांनी गुन्हा केला आहे. याबाबत भक्कम पुरावा दोषरोप पत्रात देता आला नाही. सुनावणी अंती फिर्यादी पक्षाने त्यांची बाजू साबित करू शकले नाहीत. आरोपीने घेतलेला बचाव ग्राह्य धरून सत्र न्यायाधीश जे. ए. शेख यांनी आरोपीला निर्दोष मुक्त केले.
आरोपींच्या वतीने ॲड. प्रसाद खारतोडे यांनी काम पाहिले. त्यांना सहाय्य, ॲड. प्रीती शिंदे , ॲड संतोष येडे, ॲड. अनिश शिंदे, ॲड. सिद्धेश नेवसे यांनी केले.