बारामती, (प्रतिनिधी)- महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारात तन-मनाने काम करा, अशा सूचना शिवसेनेचे संपर्क नेते संजय माशीलकर यांनी कार्यकर्त्यांना केल्या. सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्याचा शिवसैनिकांनी निर्धार केला.
लोकसभा निवडणूक अनुषंगाने बारामती, इंदापूर, दौंड येथील शिवसेना पदाधिकारर्यांची शहरातील अशोक नगर येथील जिल्हा संपर्क कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी मशिलकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद् जेवरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार प्रभारी संपर्क प्रमुख म्हणून अतिरिक्त कार्यभार दिल्याची घोषणा केली.
बैठकीस गीतांजली ढोणे, बापू दिवेकर, आदेश इंगुले, संदीप पवार, अमोल देवकाते, अमोल जगताप, अर्जुन मंडवले, सीमा कल्याणकर, योगेश नालंदे, दिग्विजय जगताप, दत्ता गावडे, मिलिंद साबळे, शिवसैनिक उपस्थित होते.