मुंबई – भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोनद्वारे धमकी आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. नागपूर येथील त्यांच्या कार्यालयात दोन वेळा धमकीचे फोन आले होते. हे फोन कॉल करणारा आरोपी जयेश पुजाराला नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जयेश पुजारा याला बेळगाव तुरुंगातून ताब्यात घेऊन विमानाने नागपुरात आणण्यात आले आहे. पोलिसांच्या चौकशीमध्ये आरोपीने धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने सांगितले की,’जयेश पुजारीला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. त्यामुळं त्याने जेलमधून पळून जाण्यासाठी जेलमधूनच गडकरींच्या कार्यालयात फोन करुन धमकी दिली होती, असा खुलासा त्याने केला आहे. मात्र सध्या तरी पोलिस त्याच्या स्पष्टीकरणावर समाधानी नसून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.’
नेमकं काय घडलं
काल नागपुर येथील नितीन गडकरी यांच्या कार्यलायत धमकीचे दोनवेळा फोन आले. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावे नितीन गडकरींना धमकी देण्यात आल्याचे देखील समोर आले होत.तसेच फोन करणाऱ्या व्यक्तीने यावेळी खंडणीची देखील मागणी केल्याचे समोर आले होते. थेट केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयात असा कॉल गेल्याने एकच खळबळ उडाली होती.