आरोग्य केंद्रात राडा घालणारा आरोपी जेरबंद

नगर  – मलमपट्टी सुटल्याने संतापलेल्या रुग्णाने प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन राडा घालून, तेथील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून औषधांची तोडफोड केल्या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे.

लखन पोपट गायकवाड हा देहरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मलमपट्टीसाठी गेला होता. मलम पट्टी नीट न झाल्याने महिला परिचारीकेला शिवीगाळ करून, दमदाटी केली. तसेच रुग्णालयातील औषधे फोडून नुकसान केले. औषधांची तोडफोड सुरू झाल्याने रुग्णालयात एकच गोंधळ उडाला.

यात रुग्णालयाचे नुकसान झाले होते. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कल्पना निवृत्ती कोहरे यांच्या फिर्यादीवरून लखन गायकवाड (रा. देहरे, ता. नगर) याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पवन सुपनर यांनी आरोपी ताब्यात घेतला असून त्याला न्यायालयासमोर हजर केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.