बनावट दारू कारखान्यावर छापा; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

शहरात पुन्हा बनावट दारू तयार करत असल्याचे झाले उघड

नगर – केडगाव परिसरातील हनुमाननगर येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून बनावट दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकून भांडाफोड केली आहे. याप्रकरणी दोघांना अटक करून सुमारे सव्वालाखाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यात विदेशी दारूच्या मोकळ्या बाटल्या, बूच व पॅकिंग मशीन आदींचा समावेश आहे.

कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून पांगरमल प्रकरणांची पुनरावृत्ती टळली असल्याची चर्चा शहरात सुरु होती. याबाबत समजलेली माहिती अशी की, हिंदुस्थान डिस्टीलरीजच्या बाजूला, नगर-दौंड रोडवर यश मेन्स पार्लरच्या मागे, हनुमाननगर, केडगाव परीसरात गुप्त बातमीनुसार मिळालेल्या माहितीवरून उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने छापा टाकण्यात आला.

आरोपी कैलास तबाजीराव औताडे (वय-28 वर्ष, रा. हनुमाननगर, नगर) यांच्याकजून 1 लाख 2 हजार 902 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच त्याच वेळेस अधिक तपास केला असता मनोज दत्तात्रय रायपल्ली (वय-45 वर्षे , रा.अतिथी कॉलनी, श्रीरामपूर, ता. श्रीरामपूर) यास अटक केली. त्याच्या ताब्यातून 13 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईत एकूण 1 हजार 16 हजार 102 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.

सदर मुद्देमालामध्ये बनावट विदेशी मद्य तयार करण्यासाठी लागणारे रिकाम्या बाटल्या, प्लास्टीक बुचे, पत्री बुचे, सिलकॅप, तसेच इसेन्स असा जुन्या बाटल्यांचे सिलकॅप तोडण्यासाठी दोन लोखंडी पट्टी एका बाजूने निमुळते व तिक्ष्ण हत्यार, दारु वाहतूककामी एक दुचाकी वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. ही कारवाई निरीक्षक ए. बी. बनकर, एस. एम. सराफ, कुसळे, सचिन वामने, कर्मचारी बी. बी. तांबट, गदादे, कदम, बडे, वाघ आदींनी ही कारवाई केली.

संपूर्ण राज्यात गाजलेल्या पांगरमल विषारी दारूकांडची पुनरावृत्ती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नगर मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सावधानतेने टळली आहे. पांगरमल विषारी दारू प्रकरणात तब्बल 10 जणांचा बळी गेला होता. तसेच अनेक निष्पाप कायमचे अपंग झाले. अनेक जन उघड्यावर आले, हे प्रकरण अजुन ताजे असतानाच पुन्हा नगरमध्ये बनावट दारु सुरु असल्याचे उघड झाले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)