महसूल कर्मचारी 30 जुलैला काळ्या फिती लावून करणार कामकाज

नगर  – विविध प्रलंबित मागण्यांकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. व 30 जुलै रोजी काळ्या फिती लावून कार्यालयीन काम काज येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

यावेळी भाऊसाहेब डमाळे, कैलास साळुंके, विजय धोत्रे, सचिन औटी, अशोक मासाळ, अनिल गुगळे, धनसिंग गव्हाणे, सूर्यकांत ओहळ, पंकज राऊत, दादा पावडे, राम नलावडे, प्रशांत वाकचौरे, अमोल शेडकर, संदेश दिवटे, गगाधर लोढे आधी उपस्थित होते.

राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्याबरोबर अनेक बैठका झाल्या. प्रत्येक बैठकीत मागण्या निर्गमित करण्याचे आश्‍वसन दिले. परंतु सहा वर्षाचा कालावधी उलटला.

मात्र, अद्यापही मागण्या मान्य होवूनही त्याची अमलबजावणी झाली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यामध्ये नाराजी पसरली आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाची रुपरेषा ठरवून विविध आंदोलने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महसूल कर्मचारी यांनी घंटानाद आंदोलन केले. व 30 जूलै रोजी काळ्या फिती लाऊन कार्यालयीन काम काज करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)