नवी दिल्ली: अमेरिकेची अंतरिक्षा संस्था नासाने एक चॅलेंज दिले आहे. हे चॅलेंज पूर्ण करणाऱ्या 26 लाख रूपयांचे बक्षिस नासाकडून मिळणार आहे. अंतरिक्षात अथवा चंद्रावर जाणाऱ्यांसाठी टॉलयलेटचे डिझाइन करण्याचे हे चॅलेंज आहे.
यातील पहिल्या तीन उत्कृष्ट डिझाइन्सना पुरस्काराची रक्कम विभागून दिली जाणार आहे. अंतरिक्षात अथवा चंद्रावर जाणाऱ्या अंतराळविरांसाठी एका अत्याधुनिक टॉयलेटची आवश्यकता असते. त्याचे वजन कमी असणे हे तर आवश्यकच आहे, मात्र चांगले रिसायकलींगचीही त्याची क्षमता असायला हवी.
नासाच्या या अटी पूर्ण करणाऱ्याला चांगली कमाई करण्याची संधी यामुळे उपलब्ध झाली आहे. 1975 या वर्षी जेव्हा अपोलो मोहीम पूर्ण झाली होती, तेव्हा अंतरिक्षात या बाबत येणाऱ्या अडचणींची माहिती अंतराळविरांनी दिली होती, व हेच मोठे आव्हान असल्याचे म्हटले होते. त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न आता केला जातो आहे.
ज्याचे डिझाइन सर्वोत्कृष्ट असेल, त्याला 15 लाख, द्वितीय क्रमांकाच्या डिझाइनला 7 लाख साठ हजार आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्याला 3 लाख 80 हजार रूपये मिळणार आहेत. डिझाइन पाठविण्याची अंतिम मुदत 17 ऑगस्ट असून पुरस्कार विजेत्यांची घोषणा ऑक्टोबर महिन्यात केली जाणार आहे.
मायक्रोग्रॅव्हिटी (अंतरिक्षिय गुरूत्वाकर्षण) आणि लूनर ग्रॅव्हिटीत (चंद्राची गुरूत्व शक्ती) काम करू शकेल असे डिझाइन असायले हवे एवढीच अट घालण्यात आली आहे. अंतराळविरांना अंतरिक्षात अथवा चंद्रावर जास्त काळ राहता यावे, याकरता एक बेस कॅम्प तयार करण्याची नासाची योजना आहे. त्याकरता ही सुविधा तेथे असणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.