मांडवगण फराटा : कुरुळी (ता.शिरूर) येथे 27 जुनला तीन महिला व एक पुरुष हे आपल्या गावी आले होते.आलेल्या चार जणांपैकी एका मुलीचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे.त्यामुळे ग्रामीण भागातही करोनाचा शिरकाव होत असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत माहीती देताना मांडवगण फराटा आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डाॕ.मंजुषा सातपुते-इसवे यांनी सांगितले कि,कुरुळी (ता.शिरूर) येथे 27 जुनला तीन महिला व एक पुरुष हे आपल्या गावी आले होते.मुंबईहून आलेल्या कुटुंबातील पुरुषाला पहिल्यांदा सर्दी,खोकला,ताप अशी लक्षणे आढळल्याने त्यांनी ताबडतोब विश्वराज हाॕस्पिटल या खाजगी दवाखान्यात चौघांची करोना चाचणी केली त्यात त्यात एका 17 वर्षीय मुलीचा अहवाल पाॕझिटिव्ह आला आहे तर दोन अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
एक अहवाल येणे बाकी आहे.करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात किती व्यक्ती आल्या त्याचा शोध सुरु असून त्यांना क्वारटाईन केले जाईल असे डाॕ. सातपुते यांनी सांगितले. ग्रामपंचायत प्रशासन करोनाची साखळी तोडण्यासाठी सक्रिय झाले असून नागरिकांनी करोनाचा फैलाव होऊ नये म्हणून सुरक्षीत खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.